spot_img
अहमदनगरभाजप पदाधिकाऱ्यावर धारदार शस्राने हल्ला!; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ..

भाजप पदाधिकाऱ्यावर धारदार शस्राने हल्ला!; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ..

spot_img

Crime News: श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील भाजपा ओबीसी उपजिल्हाध्यक्ष लखन लोखंडे यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. पण प्रसंगावधान राखून त्यांनी चाकूचा वार मुठीत धरल्याने बचावले. या हल्ल्यात लोखंडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लखन लोखंडे नेहमीप्रमाणे अशोकनगर रस्त्यावर चालले होते. त्यांना डबल चौकी येथे अज्ञात व्यक्तींनी अडविले. लगेचच एकाने चाकूने लोखंडे यांच्यावर हल्ला चढविला. त्याने पोटाच्या दिशेने चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. पण हे लक्षात येताच लोखंडे यांनी चाकू मुठीत धरून प्रतिकार केला.

यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर चाकू शिरून सहा टाके पडले आहेत. संबंधित हल्लेखोराने पुन्हा त्यांच्या मांडीवर चाकूने वार केले. तर एक वार त्यांच्या पायाच्या पोटरीवर केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

हल्लेखोर हे व्यसनाधीन व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने नागरिकाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सोन्याचे दागिने पश्चिम बंगालमधून जप्त; बंगाली कारागीरासह साथीदाराला अटक, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने...

मनपा प्रारूप प्रभाग रचना हरकतींवर शुक्रवारी सुनावणी

अहिल्यानगर । नगर सह्याद्री राज्य शासनाच्या आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग...

मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ‌‘सर्वोत्कृष्ट बँक‌’ पुरस्कार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने...

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागेश भोसले टोळीविरुद्ध ‘मोक्का’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नागेश विक्रम भोसले...