spot_img
अहमदनगरभाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता वेग आला असून महापालिका निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं! असल्याचे बोलकी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून दिली जात आहे. तर विरोधी महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारांची पहिली यादी महाविकास आघाडीचे नेते खासदार नीलेश लंके यांनी तयारी केली असल्याची सांगितले जात आहे. तर यंदाच्या होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमही मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी प्रारू प्रभाग रचना जाहीर झाली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेत शहरातील सावेडी उपनगरातील काही भाग आणि मध्यवत भागात मोठे फेरबदल झाले आहेत. हा बदल काहींच्या पथ्यावर पडला आहे तर काहींसाठी डोकेदुखी ठरला आहे. शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांनी प्रभाग निश्चित करून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांनीही आपापले प्रभाग निश्चित करून उमेदवारी जाहीर केली आहे. असे असले तरी महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणारच असल्याचा ठोस दावा केला जात आहे. जागा वाटपात महायुतीसह महाविकास आघाडीचे सूत जुळते की कसे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुस्लिम बहुल भागात एमआयएम पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

केडगावमध्ये जगताप-कोतकर समर्थक भिडणार
केडगाव हा माजी महापौर संदीप कोतकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्योजक सचिन कोतकर यांनी केडगावसह शहरात जुळवाजुळव चालविली आहे. केडगावमधील आठही जागांवर उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. तर दुसरीकडे आमदार जगताप यांनीही केडगावमधील आठही जागांवर समर्थकांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. जगताप-कोतकर समोरासमोर लढणार असल्याने अनेकांची अडचण झाली असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे सेनेच्या नगरसेवकांचे घूमजावचे संकेत
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यंतरी ठाकरे शिवसेनेतील बहुतांशी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. परंतु शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांचे वर्चस्व असलेल्या शहरातील मध्यवत भागाचा प्रभाग तुटल्याने मध्यवत शहरातील नगरसेवकांना पुन्हा नव्याने संघटनेची बांधणी करावी लागणार आहे. प्रभाग रचना वर्चस्वाला धक्का देणारी असल्याचा सूर शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी आळवला आहे. असे असले तरी प्रभागातील आरक्षण निघेपर्यंत तयारी सुरूच ठेवत आरक्षणानंतर पाहू असे त्याच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. जागा वाटपात न्याय न मिळाल्यास आणि प्राबल्य असलेल्या प्रभागात जागा न मिळाल्यास स्वगृही परतण्याचे संकेतही अनेकांनी दिले आहेत. तशा हालचालीही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

विखे-जगतापांपाठोपाठ लंकेंची यादीही तयार
नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत भाजप व राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या सोयीचे प्रभाग झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. या दोन्ही पक्षांतील जागावाटपात व उमेदवारीमध्ये आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापालिकेच्या 17 प्रभागांतील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करतांना शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांना व इच्छुकांना दूर ठेवून प्रभागातील गणिते आखली जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्याच अनुषंगाने प्रभागात भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांनी जोरदार तयारी चालविली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मात्र बुचकळ्यात पडले आहेत. दुसरीकडे विखे-जगताप यांच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी खासदार लंके यांनी तयारी चालविली असून शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत 17 प्रभागांतील संभाव्य 68 जणांची यादीच तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

आरक्षणामुळे अनेकांचा पक्षप्रवेश लांबणीवर
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने अनेकांनी आपले प्राबल्य असलेल्या प्रभागात सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारी करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. प्रभागात उमेदवारी द्यायची कोणाला असा प्रश्न स्थानिक नेत्यांसमोर आहे. भाजप, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. असे असले तरी प्रभागातील आरक्षण निघण्यासाठी अजून अवधी असल्याने अनेकांचे पक्षप्रवेश लांबणीवर पडले आहेत. अनेकांनी आरक्षणानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...

बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांची खासदार नीलेश लंके यांनी घेतली भेट

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील कळस गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गणेश तुळशीराम...