spot_img
राजकारणभाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

भाजपच्या खासदाराचे तिकीट बदलणार !! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूचक वक्तव्याने चर्चाना उधाण

spot_img

रावेर / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात २३ उमेदवारांची यादी भाजपने दिली आहे. परंतु आता एका भाजप आमदाराचे तिकीट बदलणार अशी चर्चा रंगली आहे.

रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने आपल्या २३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याच्या वक्तव्यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारसमोर संकट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. त्याचवेळी संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी धक्का बसणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...

मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे डोळे धोक्यात! नेत्रतज्ज्ञांच्या 6 सोप्या टिप्स वाचा एका क्लिकवर

नगर सहयाद्री वेब टीम आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये...