spot_img
अहमदनगरदूधवाला मंत्री गमावला..; आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

दूधवाला मंत्री गमावला..; आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राहुरी मतदारसंघातील भाजप नेते तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 66 वषय कर्डिले यांच्या निधनाने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला असून जिल्ह्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्य राजकीय मंडळींसोबत सोयरिक करून जिल्ह्यातील सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात शिवाजी कर्डिले यांनी आपले स्थान भक्कम केले होते. कर्डिले यांचा सुरूवातीला दुधाचा व्यवसाय होता. दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत. मात्र, नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते. एक एक पायरी चढत गेले.

सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीदला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंतही मजल मारली. नगर तालुका विधानसभा मतदारसंघ असताना शिवाजी कर्डिले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर ते तेथून निवडून आले. 2014 मध्ये राहुरीमधून निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. 2019 मध्ये मात्र त्यांचा परभाव झाला. 2024 च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले.

अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. नगर आणि राहुरी तालुक्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले हे अहिल्यानगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. काही महिन्यांपूवच त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आपले कार्य सुरू केले होते.

दरम्यान, विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्याने शिवाजी कर्डिले हे अनेकदा वादातही सापडले होते. मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं. मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणानं ग्रासलं होतं. नुकतेच ते एका आजारातून बरे झाले होते. मात्र आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कर्डिले यांच्या निधनाने राहुल मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पान 2 वर

हॉस्पिटलबाहेर गर्दीच गर्दी
शुक्रवारी सकाळी सकाळीच आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी आली. ही बातमी कानावर पडताच समर्थकांसह नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील, अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यातील समर्थक, पदाधिकारी, पुढाऱ्यांनी अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती. येथे विविध पक्षाचे पदाधिकारी दिसून आले.

आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला ; डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. फक्त 66 व्या वष त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.गुरुवारी आमदार कर्डिले हे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. एकत्र जेवण, संवाद आणि विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे. अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे. कालच आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत. विखे आणि कर्डिले परिवार मागील अनेक दशकांपासून एकत्र राहिले आहेत. राजकीय क्षेत्रात आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून काम केलं. माझ्या दृष्टिकोनातून ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते. त्यांच्या जाण्याने केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात सहकार, शेती, शिक्षण आणि पायाभूत विकास क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती. साधेपणा, लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसलं. त्यांच्या जाण्याने केवळ एक जननेता हरपला नाही, तर जनसेवेची एक परंपराच खंडित झाली आहे. त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांची वाटचाल पुढे नेणं हेच त्यांच्याप्रती खरं श्रद्धांजलीचं रूप ठरेल, असं डॉ. विखे पाटील म्हणाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास लाभो, अशा शब्दांत डॉ. विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला: पवार
राहुरीचे आमदार शिवाजीराव कडले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार शिवाजीराव कडले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवत सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कडले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कडले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कडले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कडले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार कडले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कडले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कडले यांच्या निधनाने कडले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कडले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची जिल्ह्यासाठी धक्कादायक बातमी: थोरात
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधनाची बातमी जिल्ह्यासाठी धक्कायदायकच आहे. आमदार कर्डिले यांच्या जाण्याने विशेषतः मतदारसंघातील व अहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीराव यांनी पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. ग्रामीण भागाचे नेतृत्व त्यांनी केले. ग्रामीण शहाणपण त्यांच्यामध्ये होते. अनेक भरीव अशी कामे त्यांनी केली. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून ओळख
शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सभागृहात काम केलं, जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती, त्यांना माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. तर, कर्डिले यांच्या निधनाने मला धक्का बसला. ते एक पैलवान होते माझ्यासोबत मंत्री मंडळात होते. त्याचं असं अचानक जाण अनपेक्षित आहे. नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...