Maharashtra politics :मोठी बातमी समोर येत आहे. अखेर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपमध्ये प्रवेश केला.
मागील काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवणार, अशा चर्चा रंगल्या होत्या .बुधवारी (ता. २७) या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपने अमरावतील लोकसभेतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राणा यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
नवनीत राणा नेमकं म्हणाल्या काय?
मागील ५ वर्ष आम्ही एनडीएचा घटक म्हणून काम करत असून पंतप्रधान मोदी विचारधारेशी जुळून काम केलं आहे. गेल्या १२ वर्षात स्वाभिमान पक्षाने एक आमदार आणि खासदार घडवला आहे. पण आता आम्ही भाजपसोबत मिळून काम करणार आहोत.