spot_img
ब्रेकिंगमराठा समाजाबद्दल भाजप नेत्याचे खळबळजनक विधान; काय म्हणाले नेमकं पहा...

मराठा समाजाबद्दल भाजप नेत्याचे खळबळजनक विधान; काय म्हणाले नेमकं पहा…

spot_img

जालना / नगर सह्याद्री –
राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गज नेते मंडळींच्या प्रचारसभांनी वेग धरला आहे. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत, असे धक्कादायक विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

बबनराव लोणीकर काय म्हणाले?
जालन्यातील एका गावामध्ये प्रचार सभेत ते बोलत होते. या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. बबनराव लोणीकर म्हणाले की, “या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत. मात्र हे गाव सर्व समाजाचे गाव आहे. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात,” मराठा समाजाबाबत केलेल्या या वक्तव्याने लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या वक्तव्यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बबनराव लोणीकर हे परतूर मंठा विधानसभेचे भाजपचे उमेदवार आहेत. परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये बबनराव लोणीकरांकडून प्रचार सुरु होता. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. Babanrao lonikar on Maratha Community |
वादानंतर लोणीकर यांचे स्पष्टीकरण
या विधानावरुन राजकारण तापल्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी आपल्या सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘आज आष्टी गावात अभूतपुर्व रॅली झाली. या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झाले होते. खेड्यापाड्यातील ३ हजार पेक्षा जास्त लोक आले होते. यावेळी आष्टीचे कौतुक करताना मी या गावात मराठा समाजाची मते कमी आहेत. हे गाव अठरा पगड जातीचे असणारे गाव आहे. ४० वर्ष या गावाने भारतीय जनता पक्षाला लीड दिले. मात्र काँग्रेसमधील हकालपट्टी केलेल्या काही जणांनी मोडतोड करुन व्हिडिओ समोर आणला, तो खोटा आहे,” असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.

“मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मला भाजपला मिळतात. मला अठरापगड जातीचे लोक मला २५ हजारंच्या मताधिक्याने निवडून देतात. कारण मी काम करतो, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी चुकीचा व्हीडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,” असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी | नगर सह्याद्री फोडाफोडीमुळे लोकसभेत...

पारनेरच्या राजकारणात ट्विस्ट; सुजित झावरे किंगमेकरच्या भूमिकेत!, काय घडलं पहा…

पारनेर | नगर सह्याद्री- विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार यांच्या आदेशाने उमेदवारी मागे घेतलेले...

निमगावकरांची खासदार निलेश लंकेंना चपराक!

संदेश कार्लेंचे फटायांच्या आतषबाजीत जंगी स्वागत पारनेर | नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके...

विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

बाजार समिती निवडणुकीत केलेली चूक विजय औटी यांना भोवली | रामदास भोसले हे पारनेरची...