spot_img
ब्रेकिंगभाजप नेते विखेंचे मंत्रीपद फायनल! अहिल्यानगर मधून कुणाला मिळणार संधी? वाचा, यादी..

भाजप नेते विखेंचे मंत्रीपद फायनल! अहिल्यानगर मधून कुणाला मिळणार संधी? वाचा, यादी..

spot_img

अहियानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अखेर दहाव्या दिवशी महायुतीकडून कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ शपथविविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा जिल्ह्यात महायुतीला दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील कोणाकोणाची वण लागणार याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मंत्रिपदासाठी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आशुतोष काळे आदी दावेदार मानले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात दणदणीत यश मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांत गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरु होता. दहाव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किती जणांचा समावेश होणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात 12 जागांपैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले व विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व काशीनाथ दाते तर शिवसेनेचे विठठलराव लंघे व अमोल खताळ यांचा समावेश आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार याकडे जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मोनिका राजळे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत. महिला म्हणून त्या देखील दावेदार आहेत. शिवाजी कर्डिले हे सहाव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. मुरब्बी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची वण देखील लागू शकते. राज्यात महायुतीला 80 टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपमध्ये दावेदाराची संख्या अधिक आहे. आमदार राम शिंदे याचा निसटता पराभव झाला आहे. ते फडणवीस यांचे समर्थक आहेत त्यामुळे त्यांची देखील मंत्रिमंडळात वण लागल्यास नवल नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे. त्यांना देखील लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आशुतोष काळे अजित पवार यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे आशुतोष काळे हे देखील मंत्रिपदासाठी दावेदार मानले जातात. डॉ. किरण लहामटे हे आदिवासी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ व नेवासा मतदारसंघातून विठठलराव लंघे विजयी झाले. दोन्ही आमदारांनी सहकाराबद असलेल्या नेत्यांचा पराभव केला आहे. खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भावी मुख्यमंत्री महणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वेसवां एकनाथ शिंदे यांच्याकडून खताळ यांचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीपदादा कोतकर विचार मंच महापालिकेसाठी ऍक्टिव्ह! ‘ते’ अभियान राबवत निवडणुकीची तयारी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे...

देवेंद्रजी, लाडक्या बहिणी अन्‌‍ त्यांच्या लेकीबाळी राज्यात असुरक्षित झाल्यात!

सारिपाट | शिवाजी शिर्के:- लोकसभा अन्‌‍ त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि...

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले...

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं...