spot_img
देशधक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मथुरापूर जिल्ह्यात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते मथुरापूरमधील भाजपचे सोशल मीडिया संयोजक होते. या भाजप नेत्याचं नाव पृथ्वीराज नस्कर आहे. भाजप नेते पृथ्वीराज यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

भाजप नेते पृथ्वीराज नस्कर यांच्या हत्येनंतर पक्षाने विविध सवाल उपस्थित केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने या हत्येमागे कोणाचा हात आहे? त्यांचा हेतू काय? असे सवाल उपस्थित केले आहेत. हत्येच्या घटनेनंतर भाजपने सरकार आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हल्ले केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकार आणि पोलीस प्रशासन पक्षपात करत असल्याची आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

बंगालमध्ये आतापर्यंत अनेक भाजप नेत्यांची हत्या झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यादरम्यान मतदानानंतर एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कार्यकर्त्या त्याच्या चहाच्या दुकानात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. पश्चिम बंगालमध्ये लवकरच ६ विधानसभा मतदारसंघाच पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्तीच्या विधानाने बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या भाजपच्या एका बैठकीत मिथुनने सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मिथुनने अमित शहा यांच्या उपस्थितीत वक्तव्य केलं होतं.

‘या भागात ७० टक्के मुस्लिम आहेत. तर ३० टक्के हिंदू आहेत. तुम्ही आम्हाला नदीत फेकाल तर एक दिवस आम्हीही तुम्हाला फेकू. आम्ही भागीरथी नदी फेकणार नाही. कारण भागीरथी नदी आमची आई आहे. आम्ही तुम्हाला दुसऱ्या जागेवर गाडून टाकू, असं वादग्रस्त विधान मिथुन चक्रवतीने केलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेला उमेदवारी का केली संदेश कार्ले यांनी स्पष्टच सांगून टाकले; महिलांना अश्रू अनावर, संदेश आमचा…

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी - संदेश कार्ले | गावसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद | नगर...

श्रीगोेंद्यातून मीच पुन्हा आमदार होणार; राहुल जगताप नेमकं काय म्हणाले पहा..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री प्रचारादरम्यान श्रीगोंदा- नगरमधील मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता नागवडे-पाचपुते या दोघांही विरोधकांना...

पगारी कर्मचार्‍यांच्या उर्मटपणाने गावागावात दहशत

मतदारसंघ ही कार्पोरेट कंपनी नसल्याचे सांगण्यास सरसावले कर्जत- जामखेडकर! कुटुंब अन् कर्मचार्‍यांपलिकडे गावागावातील पदाधिकार्‍यांचा...

आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटलांचे मोठे विधान; लीड बद्दल नेमकं काय म्हणाले पहा…

महायुतीची घटक पक्षाची बैठक संपन्न अहिल्यानगर / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी...