spot_img
अहमदनगरभाजपा नेते मनोज मुंगसे यांच्या प्रयत्नांना यश; जीएमसीसी कंपनीचा कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

भाजपा नेते मनोज मुंगसे यांच्या प्रयत्नांना यश; जीएमसीसी कंपनीचा कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री :-
सुपा एमआयडीसी मधील जीएमसीसी कंपनीने आपल्या 152 कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात, म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रशासकीय सूत्रांनी याबाबत माहिती देताना सकारात्मक धोरण असल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज मुंगसे यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. त्यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.जीएमसीसी कंपनीत अडीच वर्षांपूर्वी डिप्लोमा इंजिनिअर पात्रता असलेल्या 152 युवकांची ऑन रोल ट्रेनी म्हणून भरती करण्यात आली होती.

लवकरच त्यांचा तीन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत आहे. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल, अशी भीती निर्माण झाल्याने कर्मचारी चिंतेत होते. मात्र, कंपनीने ही भीती खोटी ठरवताना स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार नाही. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतांश कर्मचाऱ्यांना चीनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, त्यांचा अनुभव आणि कौशल्य कंपनीसाठी महत्त्वाचे आहे.

याशिवाय, काही कर्मचाऱ्यांना सुपरवायझरपदी बढती देण्यात आली आहे.मनोज मुंगसे यांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आणि भवितव्याला न्याय मिळाला. आम्ही यापुढेही कामगारांच्या हक्कासाठी लढत राहू,असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे 152 युवकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुपा एमआयडीसी मधील तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होईल. कंपनीने घेतलेल्या या सकारात्मक पावलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...