spot_img
ब्रेकिंगभाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

spot_img

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बर नेते मंडळींनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यता येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालेय, फॉर्म्यूलाही ठरलाय. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढणार आहे. भाजपचे १०५ उमेदवार ठरले आहेत.

भाजप राज्यातील विधानसभा निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर करु शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राम कदम यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी १०५ उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विद्यमान २० ते २५ आमदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक झाली. भाजप महाराष्ट्रात १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यमान १०३ आमदारांसाठी सगळ्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मुंबईसह प्रत्येक विभागात तीन ते चार आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेले गुप्त मतदान, सर्व्हे, आरएसएसकडून आलेल्या फीडबॅकच्या आधारावर काही आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपची ६० उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्यातील काही मतदारसंघात मविआचे चार ते पाच उमेदवार आहेत. त्यामुळे मविआचा जागा वाटपाचा पेच पडला आहे. मविआचे एकमत होणार नाही, त्या ठिकाणी भाजप आपली ताकद लावण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपने तशी फिल्डिंग लावल्याचे सूत्रांनी सांगितलेय. त्यामुळे त्या मतदारसंघात भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार देईल, असे सांगण्यात येत आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...