spot_img
अहमदनगरRadhakrishna Vikhe Patil Politics: अहिल्यानगरच्या राजकारणात भाजप आणि मंत्री विखे यांचेच वर्चस्व!

Radhakrishna Vikhe Patil Politics: अहिल्यानगरच्या राजकारणात भाजप आणि मंत्री विखे यांचेच वर्चस्व!

spot_img

Radhakrishna Vikhe Patil Politics: मावळत्या वर्षात अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला वरचष्मा सिद्ध केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील १० मतदारसंघावर विजय मिळवला आहे. तसेच पुन्हा एकद मंत्री विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाला समोर जावे लागले होते. दोन्ही मतदार संघ राखता आले नाही. आमदार नीलेश लंके ( नगर दक्षिण ) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी ) लोकसभेत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे आव्हान असेल असे चित्र होते. याची जाणीव महायुतीला देखील झाली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयासाठी मंत्री विखे पाटील यांनी मोठी यंत्रणा उभी केली. त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्याचे फळ त्यांना मिळाले अशी स्थिती आहे.

यावेळी अति आत्मविश्वासाने महाविकास आघाडीचे घटक पक्ष जागा वाटपातच आपली शक्ती खर्च करण्यात व्यस्त दिसून आले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसला. या सर्व घडामोडीत विविध समाज घटक नाराज असतानाही लाडकी बहीण योजनेने भाजपला तारले, अशी स्थिती राहिली. भाजपने साम-दाम दंड भेद या सर्व नीतीचा निवडणुकीत वापर केला. तेवढी ताकद आणि अर्थशक्ती महा विकास आघाडीकडे नव्हती, याची जाणीव निवडणुकीत दिसून आली.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ४ जागा जिंकल्या. शिवसेना शिंदे गटाला दोन जागा राखण्यात यश आले. काँग्रेस पक्ष मात्र एका जागेवर आला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातील १० जागांवर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले. यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना घरी बसावे लागले. काँग्रेसचे हेमंत ओगले (श्रीरामपूर) तर रोहित पवार ( कर्जत- जामखेड ) हे दोनच आमदार महाविकास आघाडीचे जिल्ह्यात राहिले आहे. महायुतीने १० जागेवर धोबीपछाड दिली.

काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाची चव चाखावी लागली. अहिल्यानगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्रयाने आमदार अमोल खताळ संगमनेर मतदारसंघात जाईंट किलर ठरले. राहुरी मतदार संघात शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाली. शिवाजी कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत 2019 मधील पराभवाचा वचपा घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खासदार लंकेंच्या गडाला सुरुंग लावण्यात आमदार काशिनाथ दाते यशस्वी ठरले.

महायुतीनं महाविकास आघाडीला धक्का देत एकहाती सत्ता मिळवली. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीने जे वर्चस्व प्रस्थापित केले आहे त्यामध्ये विखे पिता पुत्रांचा नक्कीच मोठा वाटा राहिला आहे. विशेष म्हणजे या निकालामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभेत किंगमेकर ठरले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना आता सत्तेचे महत्त्व माहित असल्याने महायुती खुणावू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेत गमावलेल्या जागांमुळे महाविकास आघाडीला पक्षांतराचे आणखी धक्के बसणार असे संकेत मिळू लागले आहेत.

नगरच्या राजकारणातील मोठं नाव
नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील समावेश आहे. विखे-पाटील घराणं हे राजकारणातील चांगले मोठे नाव आहे. कारण त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात नगर जिल्ह्यामध्ये विखे घराण्याचा कोणी हात धरू शकत नाही. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

1986 पासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात
महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले असे म्हणता येईल की, तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. यादरम्यान, त्यांनी आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील आणि वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून अहिल्यानगरमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील
जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे (2024)
महसूलमंत्री – (2022-2024)
गृहनिर्माणमंत्री – (2019-1019)
विरोधी पक्षनेता (महाराष्ट्र विधानसभा)- (2014-2019)
कृषीमंत्री, अन्न व औषधनिर्माण विभाग, मराठी भाषा, इतर मागासवर्ग विभाग मंत्री (2010-2014)
परिवहनमंत्री, बंदरे, विधी व न्यायविभागाचे मंत्री- (2009-2019)
शालेय शिक्षणमंत्री- (2008-2009)
कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागााचे मंत्री (1995-1999)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...