जामखेड / नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवालात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांचा छायाचित्र नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेसमोर सोमवारी प्रस्थापितांचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड येथील कार्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा बॅंकेच्या अर्थिक ताळेबंदात सभापती प्रा. राम शिंदे यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली व पदाधिकारी व प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, शहर मंडळ अध्यक्ष संजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे बाजार समितीचे संचालक गौतम उतेकर, वैजिनाथ पाटील, रविंद्र हुलगुंडे, सचिन घुमरे, नारायण जायभाय, राहुल बेदमुथ्था, डॉ. गणेश जगताप, मोहन गडदे, नगरसेवक अमित जाधव, तात्याराम पोकळे, गोरख घनवट, उध्दव हुलगुंडे, मोहन देवकाते, उदयसिंह पवार, डॉ. जयराम खोत, रखमाजी मुंडे, महालिंग कोरे, राजेंद्र ओमासे, चेअरमन अशोक महारनवर, सरपंच महारुद्र महानवर, जालिंदर चव्हाण, सुशिल आव्हाड, राहुल चोरगे, डॉ अल्ताब शेख,अजय सातव,भैय्या थोरात, गणेश लटके, श्रीराम डोके, संदीप जायभाय, बाळासाहेब गोपाळघरे, मा. ऋषिकेश नेरकर, राजू गोरे, कल्याण शिंदे, किरण जाधव, मिलिंद देवकर, संजय बेरड, अन्सार पठाण,भारत ढवळे, बाबासाहेब फुलमाळी, पृथ्वीराज भोसले, भारत उगले, मलिकभाई, अंगद गव्हाणे, चेअरमन मगन बहीर, गौतम कोल्हे, विशाल भांडवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे हे आपल्या जिल्हयाचे भूषण आहे. या भुमिपुत्राचा सन्मान जिल्हा बँकेने करणे आवश्यक आहे परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच सदर अहवालात प्रशासनाने फोटो छापला नाही याचा आम्ही सर्व भाजप निषेध करतो.
बॅंकेवर महायुतीची सत्ता तरीही प्रस्थापितांनी डावलले
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेवर भाजप महायुतीची सत्ता आहे. यामध्ये अनेक प्रस्थापित नेते आहेत व त्यांच्या ताब्यातच बॅक आहे. यापूर्वी असा प्रकार या बॅकेत झाला नाही. मात्र ती परंपरा खंडित करण्याचे काम करण्यात आले. जामखेडचे भुमिपुत्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचा फोटो छापला नाही. यामागे कोण आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत गेली पाहिजे अशी भूमिका युवा नेते उदयसिंह पवार यांनी मांडली.