spot_img
अहमदनगरकाँग्रेस विरुद्ध भाजप आक्रमक; 'या' नेत्याचा जाळला पुतळा

काँग्रेस विरुद्ध भाजप आक्रमक; ‘या’ नेत्याचा जाळला पुतळा

spot_img

भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन
अहमदनगर | नगर सह्याद्री –
ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तेलीखुंट येथे दहन करण्यात आले. वारंवार पंतप्रधानांबद्दल चुकीचे वक्तव्य खपवून न घेता जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तेली समाज व ओबीसी समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या गंधे), युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, प्रकाश सैंदर, विजय काळे, हरिभाऊ डोळसे, अरविंद दारुणकर, ज्ञानेश्वर काळे, सोमनाथ देवकर, देविदास साळुंखे, चेतन डोळसे, दिलीप साळुंके, सागर लोखंडे, स्वरुप नागले, संतोष मेहत्रे, संतोष हजारे, गणेश म्हस्के, विक्रम शिंदे, दिलीप  दारूणकर, पप्पू गर्जे, बंटी ढापसे, गोपाल वर्मा, सुमित बटुळे, स्वप्निल बेद्रे, ऋदेश अंबाडे, आकाश सोनवणे, ओंकार लेंडकर, सोमनाथ जाधव, सुजित खरमाळे, करण कराळे, सुजय मोहिते, अमोल निस्ताने, अभिजीत म्हस्के, श्रेयस नराळ, बाबासाहेब सानप, प्रकाश जोशी, यश शर्मा, राहुल जामगावकर, सुजय मोहिते, बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, ज्ञानेश्वर धिरडे, पप्पू गर्जे, गोपाल वर्मा, सुमित बटुळे, स्वप्निल बेद्रे, कालिंदीताई केसकर आदी सहभागी झाले होते.

महेंद्र गंधे म्हणाले की, राहुल गांधी यांना पंतप्रधानांच्या जातीवर बोलण्याचा त्यांना हक्क नाही. चुकीचे वक्तव्य भाजप खपवून घेणार नाही. मयूर बोचुघोळ म्हणाले की, राजकारणात जातीय मुद्द्यांचा आधार देऊन समाजाला
व भाजपला टार्गेट केले जात आहे. समाजामध्ये दुही निर्माण करून सत्ता मिळवण्याची काँग्रेसचे षडयंत्र आहे. ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा ही रणनीती ते आचरणात आणत असून, काँग्रेसच्या नेत्यांनी गलिच्छ राजकारणाची पातळी गाठली असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...