Satish Bhosale: वाल्मीक कराड याच्यानंतर आता खोक्याभाईलाही व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आले आहे. खोक्याभाईला रॉयल ट्रिटमेंट मिळत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तुरुंगात खोक्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी मिळते. त्यासोबत डझनभर नातेवाइकांना भेटण्यासाठ परवानगी मिळतेय. मोबाईलवर अनलिमिटेच बोलण्यासही त्याला मिळत असल्याचं समोर आलेय. या प्रकरणाचा एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला आहे.
खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. खोक्याला तुरूंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाही अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस मिळणार आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार असल्याचे दिसते.कारागृहाच्या आवारात सतीश भोसले जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभा असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडीओत खोक्या भाई बिनधास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे. यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत दिले आहेत.