spot_img
मनोरंजनऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये बिनसले? चित्रपट सृष्टीत विविध चर्चाना उधाण

ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये बिनसले? चित्रपट सृष्टीत विविध चर्चाना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कपल नेहमीच त्यांच्या चाहत्यांचं आवडतं आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमी चर्चेत असते. आता ही जोडी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांत बिनसल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. नेहमी प्रत्येक गोष्टीवर रिऍट होणारी ही जोडी यावेळी मात्र काही न बोलताना दिसली. याचदरम्यान ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिच्या पोस्टमुळे या दोघांत दुरावा आल्याचं बोललं जात आहे. नुकतंच ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराय यांच्या जयंतीनिमीत्त तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये एका फोटोत आराध्या आणि तिचे वडील दिसत आहेत. दुसर्‍या फोटोच ऐश्वर्या तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. तिसर्‍या फोटोत ऐश्वर्या तिची आई लेक आराध्यासोबत दिसत आहे.

या फोटोच्या पाठीमागे तिच्या वडिलांच्या फोटोची फ्रेम दिसत आहे. हे फोटो ऐशने तिच्या सोशल मीडियावर शेअर करताने ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, की ’लव्ह यू ऑलवेज, डिअरेस्ट डिअर डॅडी-अज्जा. मोस्ट लव्हिंग, काळजी घेणारा, स्ट्रॉन्ग तुमच्यासारखा कोणीच नाही. तुमच्या स्मरणार्थ प्रार्थना. आम्हाला तुमची खूप आठवण येते.

मात्र ऐशने अभिषेकसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....