spot_img
अहमदनगरदुचाकी पेटली; युवकाचा होरपळून मृत्यू,'या' महामार्गावरील घटना

दुचाकी पेटली; युवकाचा होरपळून मृत्यू,’या’ महामार्गावरील घटना

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा-जामखेड महामार्गावर आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. वळणावर असलेल्या संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकीला लागलेल्या आगीत तांदळी दुमाला येथील बंटी उर्फ विनय संजय धालवडे (वय २५) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बंटी धालवडे व त्यांचा एक सहकारी दुचाकी (क्र. एमएच १६ एयू ७६९९) वरून श्रीगोंद्याहून तांदळी दुमालाकडे जात होते. आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर त्यांच्या दुचाकीने कठड्यास जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला व काही क्षणातच भीषण आग लागली.

या आगीत बंटी धालवडे हे दुचाकीखाली अडकले गेले व आगीत भाजून गंभीर जखमी झाले. त्यांचा सहकारी धडकेनंतर बाजूला फेकला गेला. अपघात होताच जवळच राहणारे अनिल जाधव यांच्यासह कुटुंबातील महिलांनी तत्काळ धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. बंटीला आगीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत ते गंभीर भाजले गेले होते.

जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. बंटी धालवडे यांच्यावर ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील दुसर्‍या जखमीवरही उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बंटी धालवडे यांच्या अकाली निधनामुळे तांदळी दुमालामध्ये शोककळा पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...