मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बिहार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपच्या माध्यमातून बिहारचा जो विकास झाला आहे त्यामुळेच जनतेने भाजपवर एवढा मोठा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. बिहार तो झांकी है- अहिल्यानगर अभी बाकी है! येणाऱ्या काळात अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपची ही विजयी घोडदौड सुरूच राहील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते मिलिंद गंधे यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाखालील एनडीए ने स्पष्ट बहुमत मिळवल्यावर अहिल्यानगर मध्ये शहर भाजपच्या वतीने चौपाटी कारंजा येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्या पुढे फटाके वाजवून व नागरिकांना पेढे वाटून बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, माजी सरचिटणीस प्रशांत मुथा व सचिन पारखी, वसंत लोढा, संतोष गांधी, बाळासाहेब खताडे, पियुष तावरे, पंडित वाघमारे, डॉ.दर्शन करमाळकर, राजू वाडेकर, राजेंद्र दळवी, बंटी बद्रे, मुकेश दिवाने, सुरेखा जंगम, अविनाश वाणी, दीपक देरेकर, अमित पखले, अजय ढवळे, विजय एडके, कपिल सुडके, अनुप पडोळे, अतुल जोशी, सुजित बळकट, आदिनाथ येंडे सुनील तावरे व ज्ञानेश्वर भांगे आदी उपस्थित होते.
प्रशांत मुथा म्हणाले, बिहार मधील डबल इंजिन सरकारने जो विकास केला त्यामुळेच निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ने मोठे बहुमत मिळवले आहे. भाजपवर खोटे आरोप करणाऱ्या कॉंग्रेस व इतर विरोधकांना तेथील जनतेने चांगलीच धूळ चारली आहे.
मयूर बोचूघोळ म्हणाले, नागरिकांना आता केवळ विकास पाहिजे आहे. त्यामुळे विरोधकांनी जे व्होट चोरीच्या आरोपाचे वावटळ उठवले होते त्यास बिहार मधील नागरिकांनीच सडेतोड उत्तर भाजपला भरभरून मतदान करून दिले आहे.
यावेळी वसंत लोढा, सचिन पारखी यांनीही मनोगत व्यक्त केले.



