spot_img
ब्रेकिंगपूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठे अपडेट, UPSC तर्फे गुन्हा दाखल…

पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठे अपडेट, UPSC तर्फे गुन्हा दाखल…

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करु नये? अशी नोटीस पाठवली आहे. राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे.

दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा-2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षा नियमांनुसार दिली नाही.

परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली. त्यामुळे यूपीएससीने पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...