spot_img
ब्रेकिंगPune car accident case: पोर्श कार अपघात प्रकरणात मोठा निर्णय; उच्च न्यायालयाचे...

Pune car accident case: पोर्श कार अपघात प्रकरणात मोठा निर्णय; उच्च न्यायालयाचे आदेश

spot_img

पुणे / नगर सह्याद्री
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशील असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाची आत्या पुजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. कोर्टाने मुलाला अत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

अल्पवयीन आरोपीची आत्याने हेबियस कॉर्पस याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका मान्य करण्यात आली. कायद्यानुसार कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात घेता येत नाही, यावर याचिका दाखल केली होती वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने अल्पवयीन मुलाला मुक्त करण्याचे आदेश दिले. २२ मे २०२४, ५ जून २०२४ आणि १२ जून २०२४ रोजीचे जे आदेश आहेत ज्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते ते बेकायदेशील आहेत असे कोर्टाने निकालात म्हटल्याचे वकीलांनी सांगितले.

बालन्याय मंडळाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी आदेश दुरुस्तीसाठी अर्ज करणे आणि त्या अर्जावर मंडळाने सुधारगृहाच्या कोठडीचा आदेश दिल्याने पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेणे हे बेकायदा, असे हायकोर्टाने मुलाच्या आत्याच्या याचिकेवर निर्णय देताना स्पष्ट केले.

पुणे शहरात १९ मे रोज घडलेल्या या अपघाताची चर्चा संपूर्ण राज्य आणि देशात देखील झाली होती. अल्पवयीन मुलाने वेगवान पोर्श कारने दोघांना धडक दिली होती ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. अपघातानंतर काही तासात जामीन मंजूर करणे असे की रक्ताच्या नमुन्यात बदल करणे यामुळे अपघाता संदर्भातील प्रत्येक गोष्टीवर चर्चे होत असते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...