spot_img
ब्रेकिंगसंतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; त्या दोघांना पुण्यातून उचलले, आंधळे फरार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; त्या दोघांना पुण्यातून उचलले, आंधळे फरार

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी घुले याच्यासोबतच सुधीर सांगळे याच्याही मुसक्या आवळल्या आहेत.बीड पोलिसांच्या विशेष पथकाने या दोघांना पुण्यातून उचलले. अधिक तपासासाठी या दोघांना सीआयडीच्या ताब्यात देणार असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, त्याला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

मस्साजोगचे सरपंच पती संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. या प्रकरणात सात आरोपी असल्याचे समोर आलेय. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक कराड याआधीच पोलिसांना शरण आला होता. आज पोलिसांनी घुले आणि सांगळे यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर आंधळे हा अद्याप फरारच आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी घुले आणि सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. तर अन्य एकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे. काही वेळात पोलीस अधीक्षक पत्रकारांशी साधणार संवाद आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याचं समजतेय. पण पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये घुले आणि सांगळे यांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी एकाला अटक केली.त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

पकडलेले आरोपी प्यादे मुख्य आरोपी आका
पकडलेले आरोपी हे प्यादे आहेत, मुख्य आरोपी आका आहे. मी म्हणालो होतो बकरे की अम्मा कब तक दुवा मागे गी म्हणालो होतो, आज दोन आरोपींना अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये चालू असलेल्या चौकशीमध्ये आपण समाधानी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

26 दिवस का लागले? संदीप क्षीरसागर यांचा सवाल
आरोपी अटक होण्यासाठी 26 दिवस का लागले? संदीप क्षीरसागर यांनी सवाल उपस्थित केला. वाल्मीक कराड याला अटक करून देखील 302 मध्ये का नाही? आरोपी गंभीर गुन्हा असताना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, आणि सरेंडर कधी व्हायचे ते ठरवतो. यांना वेळ दिला जात आहे पुरावे नष्ट करायला का? असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...