spot_img
ब्रेकिंगउद्योजक परदेशी खून प्रकरणात मोठी अपडेट; 'त्यांना' सुपारी दिली..

उद्योजक परदेशी खून प्रकरणात मोठी अपडेट; ‘त्यांना’ सुपारी दिली..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
व्यापारी दिपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचे दहा कोटींसाठी अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत 24 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. परदेशी यांचा खून करण्यासाठी त्यांना सुपारी देण्यात आल्याचा, तसेच गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी रेकी केल्याचा संशय व्यक्त करत पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

तोफखाना पोलिसांनी किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) व त्याचा साथीदार सागर गिताराम मोरे (वय 28, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) या दोघांना अटक केलेली आहे. त्यांना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, घटनास्थळावरील माती, रक्त मिश्रित माती, कार मधील केसांचे नमुने संकलित केले आहेत. त्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी केली. तर, आरोपींच्या वतीने ड. महेश तवले, ड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. मयत दिपक परदेशी यांचे अपहरण करुन त्यांचा खून करण्याची सुपारी आरोपींना कोणी दिली, याबाबत आरोपी जाणूनबुजून असबंध माहिती देत आहेत. पडद्याआड राहून हा गुन्हा कोणी केला, याचा तपास करायचा आहे. मयत दिपक परदेशी यांनी किती व कोण कोणत्या लोकांना व्याजाने पैसे दिले होते, याची माहिती आरोपीकडून हस्तगत करायची आहे.

मयताने लोकांना पैसे दिले होते, व ते पैसे परत द्यावे लागू नये, म्हणूनच कोणी आरोपीना सुपारी दिली होती का, याबाबत तपास करायचा आहे. आरोपी गुन्हा करण्यापूव, गुन्हा करताना व गुन्हा केल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलवरील ॲप्लीकेशन, सोशल मिडीया ॲप्लीकेशचा वापर करत होते. त्याबाबत तपास करायचा आहे. त्यांचे मोबाईल जप्त करायचे आहेत. आरोपींनी पूर्व तयारी (रेकी) करून गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगत त्यादृष्टीने तपास करायचा आहे, त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली. न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली.

दरम्यान, मयत दिपक परदेशी यांनी ब-याच लोकांना व्याजाने पैसे दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी आरोपींनी परदेशी यांच्याकडून काम घेतले होते. त्या करीता त्यांच्यात नेमका काय व्यवहार ठरला होता. सदरचा अर्थिक व्यवहार मयताने पूर्ण केला नसावा व त्यातूनच आरोपींनी मयताचा खून केला का, यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. मात्र, आरोपी याबाबत तपासात उपयुक्त माहिती देत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...