spot_img
ब्रेकिंगसरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर!

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर!

spot_img

Santosh Deshmukh Murder Casel: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. आरोपींना न्यायालयीन कोठडीसुनावण्यात आली असली, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. अशातच, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात यश आले आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच, विष्णू चाटे यांच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला असून, त्यात महत्त्वाची माहिती असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तपासात काही गोपनीयता पाळायची असल्याने सविस्तर माहिती दिली जात नाही, परंतु तपास समाधानकारक सुरू आहे, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. आरोपींची स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेण्यात आली होती, त्यामध्ये मोबाईल सापडले होते. देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी शूटिंग केल्याची चर्चा होती. आता घुले याच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाल्यामुळे ते व्हिडिओ मिळतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडेयांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिली आहे. धनंजय देशमुख यांनी केजयेथील शासकीय विश्रामगृहावर सीआयडीचे अधिकारी अनिल गुजरयांची भेट घेतली आणि तपासाच्या अनुषंगाने चर्चा केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...