spot_img
अहमदनगरसंतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट!, १४०० पानांचे आरोपपत्र दाखल, आठ आरोपी...

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट!, १४०० पानांचे आरोपपत्र दाखल, आठ आरोपी कोण?

spot_img

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची काल नियुक्ती झाली. त्यानंतर या प्रकरणातील तपासाची सूत्रे वेगाने फिरताना दिसत आहेत. कारण आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडसह इतर 8 आरोपींच्या विरोधात सीआयडी 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळ आता दाखल करण्यात येणाऱ्या आरोप पत्रातुन मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात केली जात आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतूनही हत्या झाल्याचे समोर आले होते. या हत्येची सुरुवात ज्या खंडणी प्रकरणातून झाली होती, त्या खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सीआयडीच्या हाती होता. खूनाचा तपास डखढ कडे आहे. त्यामुळे सीआयडी कडून दाखल करण्यात येणाऱ्या 1400 पानी आरोपपत्रात नक्की काय खुलासे होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

1400 पानांचे आरोपपत्र
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मीक कराडसह 8 आरोपींच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल करणार आहे. हे साधारण 1400 पानांचे आरोपपत्र खंडणी प्रकरण आणि अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे .या आरोप पत्रात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांच्या विरोधात असलेले पुरावे आणि गुन्ह्यातला सहभाग या संदर्भातले पुरावे आहेत. बीडच्या विशेष मकोका कोर्टात ही चार्जशीट दाखल होणार असून साक्षीदारांचे जबाब ,खंडणी प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण ?आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली ? आरोपींना आर्थिक मदत कोणी केली या महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी शब्द पाळला! साकळाई योजनेचा मार्ग मोकळा; लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदोत्सव

घोड प्रकल्पाच्या फेर जल नियोजनास शासनाची मंजुरी सुनील चोभे / नगर सह्याद्री पुणे जिल्ह्यातील शिरूर...

महाराष्ट्रावर नवं संकट; अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीकडून 9 जिल्ह्यांना हायअलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री - देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात...

सरपंचापाठोपाठ माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या; कुठे घडला प्रकार पहा

जळगाव / नगर सह्याद्री - जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जळगावजवळील...

सुपा एमआयडीसीत स्थानिकांवर अन्याय!; आ. काशीनाथ दाते यांनी वेधले लक्ष

टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारीत एमआयडीसीची गरज अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेर मतदारसंघामध्ये सुपा एमआयडीसी अतिशय चांगल्या...