spot_img
ब्रेकिंगमोठी अपडेट; मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय, वाचा सविस्तर

मोठी अपडेट; मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरण, राज्य कामगार विमा महामंडळासाठी रुग्णालयांना जमीन आणि MSRDC ला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग” असे या आयोगाचे नाव असेल. या आयोगासाठी आवश्यक पदे निर्माण केली जातील. तसेच कार्यालयीन जागा आणि इतर खर्चांना देखील मान्यता देण्यात आली आहे. “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार,” असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. या जमिनीच्या हस्तांतरणासाठी करारामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

राज्य कामगार विमा महामंडळ (ESIC) कर्मचाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. यासाठी मौजे करोडी येथे सहा हेक्टर गायरान जमीन देण्यात आली आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर-चंद्रपूर, सिन्नर-नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथे रुग्णालये उभारण्यासाठी जमिनी देण्यास तत्वतः मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) पथकराच्या सवलतीमुळे होणारे नुकसान भरून मिळणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे MSRDC ला जो आर्थिक भार येणार आहे, त्याची भरपाई शासन करणार आहे. “मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई,” असे शासनाने म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मालेगाव बॉम्बस्फोटात पंतप्रधानांसह योगींना अडकवण्याचा कट होता; प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा दावा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा...

सिस्पेबाबत पोलिसांची कोणती मर्दुमकी?; त्याचवेळी दखल घेत असती तर सिस्पेची टोळी…

450 कोटींना टोपी घालणाऱ्या सिस्पे, ट्रेडज्‌‍च्या संचालकांवर न्यायालयाचे आदेशाने गुन्हा / आरोपी शोधण्याचे धाडस...

अयोध्येतील राम मंदिर उडविण्याची धमकी; बीडच्या तरुणाला मेसेज, लोकेशनही पाठवले

बीड / नगर सह्याद्री : अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला...

‘आमदार जगताप यांच्या घरी संभाजी भिडे गुरुजींची भेट’; काय दिला सल्ला?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी...