spot_img
अहमदनगरदिशा सालियन प्रकरणात मोठा ट्वीस्ट!, अफेअरमुळे आत्महत्या?

दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्वीस्ट!, अफेअरमुळे आत्महत्या?

spot_img

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागले आहे. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचं समोर आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या अफेअरमुळे दिशा पैसे देऊन वैतागली होती. दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबाबत मित्रांनाही सांगितले होते. याच सगळ्या गोष्टीमुळे दिशा तणावात होती, त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याच मालवण पोलिसांनी निष्कर्षमध्ये म्हटले आहे.

प्रोजेक्टमध्ये झालेले नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे दिशा तणावात होती. दिशाने याबाबत मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मैत्रिणींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, त्यामधून ही माहिती समोर आली आहे.पोलिसांनी 4 जून 2021 रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवला होता, असेही समजतेय. दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र, आई वडिलांचे नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता.

मालवण पोलिसांनी तयार केलेले क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये राज्य सराकरने एसआयटीची बनवून तपास सुरू केला. राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, दिशा सालियन यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याची सुनावणी होणार आहे.

दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच मृत्यू
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात धाव
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याची सुनावणी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...