मुंबई । नगर सहयाद्री:-
नुकसाच प्रदर्शीत झालेल्या छावा चित्रपट आणि सपा आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब याच्या गौरावाचे उद्गागारानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील औरंगजेबच्या कबरीवरून वक्तव्य केलं आहे. ते श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणीला जोर धरत असतानाच फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगजेबच्या कबरीबाबत अशी मागणी झाली नव्हती. पण आता पुन्हा एकदा या मागणीसाठी जोर वाढला आहे. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी ऐनवेळी औरंगजेबावर स्तुती सुमनं उधळल्याने याचा वाद आणखीन वाढला आहे. आझमींच्या कृतीमुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून आझमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
राज्यातील प्रत्येकाला औरंगजेबची कबर हटवली पाहिजे असेच वाटते. पण काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. त्या झटकनं होत नाहीत. औरंगजेबच्या कबरीला काँग्रेसने सरंक्षण दिले. तर ती काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी करताना काँग्रेसवरच खापर फोडलं आहे. तसेच ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली सध्या असल्याचेही फडणवीस यांनी सांगत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या कबरीला कायदेशीर संरक्षण असून ते विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलावं लागतं. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी देखील या कबरीवरून सूचक वक्तव्य करताना, ही किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.