spot_img
ब्रेकिंग'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान'

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती की गृहमंत्री जेलमध्ये गेले होते अशी टीकाही त्यांनी केली.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर विरोधक कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. “आरोपीने पोलिसांवर गोळी चालवली तर पोलिसांनी गोळी का चालवली? असं विचारतात. हे डबल ढोलकीवाले आहेत. यांच्यात काही नैतिकता नाही. बदलापूरमधील आरोपीची बाजू घेणारे हे लोक काय कायद्याची भाषा करतात”.

बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “बाबा सिद्धीकी लोकप्रतिनिधी होते. दोघांना अटक केली असून एक फऱार आहे, त्याला लवकर पकडलं जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढून फाशी देण्याची विनंती करु. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही,” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

“महाविकास आघाडीत तर गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती. उद्योगपतीच्या घऱाखाली बॉम्ब लावत होते, त्यात पोलीस सहभागी होती. गॉटेलमधून पैसे वसूल करत होते. त्यावेळी गृहमत्री जेलमध्ये होते. आता जो कायदा हातात घेईल त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. फाशीची शिक्षा दिली जाणार. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...