spot_img
ब्रेकिंगवर्धापनाच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा जय महाराष्ट्र...

वर्धापनाच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा जय महाराष्ट्र…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मुंबईसह राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच दोन्ही शिवसेनेचा आज मुंबईत वर्धापन दिन साजरा होणार आहे. दोन्ही शिवसेना आज शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईचं राजकीय वातावरण तापलं आहे. या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते वर्धापनाच्या दिवशी शक्तिप्रदर्शनाची तयारी करत असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या मातोश्रीच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित राहिलेले दोन माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंना साथ देणार आहे. ठाकरेंचे दोन आणि शरद पवार गटाचा एक असे मिळून तीन माजी नगरसेवकांचा आज गुरुवारी शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. शिंदे गटाच्या वर्धापनाच्या सोहळ्यात पक्षप्रवेश होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या माजी नगरसेवकांचा शिंदे गटाच्या नेत्यांसोबत बैठका सुरु होत्या. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाला बळ देण्यासाठी काय गरज आहे, याविषयी ठाकरेंनी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर पक्षाला लागलेली गळती थांबेल, असं बोललं जात होतं. मात्र, बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...