spot_img
अहमदनगरकांदा उत्पादकांना मोठा दिलासा; केंद्र सरकार म्हणाले...

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; केंद्र सरकार म्हणाले…

spot_img

खा. सुजय विखे यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकर्‍यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा. विखे पाटील यांनी दिली. शाह यांनीही लवकरच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे आश्वासन दिले आहे.

सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकर्‍यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणार्‍या एकूण खर्चाचा विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव कमी आहे. नगर, नाशिक, पुणे या पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी मोठ्याप्रमाणात असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. ही वस्तुस्थिती खा. विखे यांनी शाह यांच्या समोर मांडत हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणार्‍या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.

यावर शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा. विखे पाटील यांनी केली.

यावेळी खा. सुजय विखे यांना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतल्या आहेत. सरकार शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही. या दृष्टिकोनातून लवकर शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोस्तीत कुस्ती! मित्रांचा मित्रावर हल्ला; दिल्ली गेट परिसरात खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची...

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक पारनेर / नगर सह्याद्री पारनेर...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...

आजचे राशी भविष्य! ‘या’ ७ राशींसाठी शुभ दिवस, कामात मिळणार यश; धनलाभ होणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ...