spot_img
अहमदनगर'अर्बन'च्या ठेवीदारांना मोठा दिलासा; मिळणार 'इतकी' रक्कम...

‘अर्बन’च्या ठेवीदारांना मोठा दिलासा; मिळणार ‘इतकी’ रक्कम…

spot_img

एकरकमी कर्ज परतफेड योजनेस प्रतिसाद / अर्बन बँकेची ३० कोटी ८६ लाखांची वसूली / अवसायक गणेश गायकवाड यांची माहीती
अहमदनगर / नगर सह्याद्री
रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती.  दरम्यानच्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये  २० जुलै अखेर बँकेच्या एकुण कर्जापैकी रुपये ३० कोटी ८६ लाख वसूल करण्यात आले आहेत.

थकीत कर्ज वसुलीला आणखी गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ०५ जुन २०२४ पासून सुरू केली आली आहे. या योजनेस थकीत कर्जदारांचाप्रतिसाद मिळत असून ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी एका महिन्यात २३९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी १४ कर्जदारांनी आतापर्यंत १०० टक्के रक्कम रुपये ३ कोटी  ८९ लाख  २९  हजार रुपये भरले आहेत.  ५ कर्जदारांनी ओटीएसमध्ये ठरलेल्या अंतिम रकमेच्या २५ टक्के रक्कम रुपये ६ लाख ८७ हजार रुपये भरली असून उर्वरित रक्कम  देखील लवकरच ठरल्याप्रमाणे जमा होणार आहेत. त्याचबरोबर डीआयसीजीसीच्या तिसर्‍या लेमच्या माध्यमातून १७ हजार ४२४ ठेवीदारांना ६३.१५ कोटी लवकरच देण्यात येणार  असल्याची माहिती एनसीडीसीचे संचालक तथा बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली. न्यायालयाच्याआदेशानुसार तसेच पोलीस  प्रशासनामार्फत देखील थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू असून सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी पोहचले थेट आदमपूर एयरबेसवर; जवानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

शिर्डी । नगर सहयाद्री शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...