spot_img
ब्रेकिंगटोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. मात्र आता ऐन दिवाळीत केली जाणारी ही भाडे वाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हंगामी भाडेवाढ रद्द
भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्याप्रमाणे या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.

प्रवाशांना दिलासा
यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटी महामंडळाने साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले होते. एक महिन्यासाठी ही भाडेवाढ कायम राहणार होती. हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होणार होती. मात्र, एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर आता राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांना देखील मोठा दिलासा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...