spot_img
अहमदनगरपारनेरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पिक विम्यापोटी १२१ कोटी, खासदार नीलेश लंके यांची...

पारनेरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पिक विम्यापोटी १२१ कोटी, खासदार नीलेश लंके यांची माहिती

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री
मागील सन २०२३ मधील पिक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वी १६ कोटी ५० लाख रूपयांचा सोयाबिन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरीत पिकांसाठी १०५ कोटी रूपये असा एकूण १२१ कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

कोणत्या पिकासाठी किती विमा याची मंडलनिहाय आकडेवारी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. तालुक्यातील हवामान तसेच नैसिर्गीक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ व्हावा यासाठी खा. नीलेश लंके यांनी शासनाकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता. शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा यासाठी खा. लंके हे नेहमीच प्रयत्नशिल असतात. त्याचाच एक भाग म्हणून पिक विम्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खा. लंके यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात मुग, सोयाबिन, बाजरी, तुर, कांदा, उडीद या ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा ५७ हजार १८५ शेतक-यांनी विविध १ लाख ४८ हजार ८३४ आवेदनपत्रांद्वारे पिक विमा उतरविला होता.

दरम्यान, पिक विमा उतरविल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबिनची अग्रीम रक्कम म्हणून १६ कोटी ५० लाख रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरीत १०५ कोटी रूपये इतकी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पिक विम्यासंदर्भात काही अडचण असल्यास आपल्या पारनेर शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...