spot_img
अहमदनगरअहमदनगरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा? महायुती सरकारमुळे 'ते' काम अंतिम टप्प्यात

अहमदनगरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा? महायुती सरकारमुळे ‘ते’ काम अंतिम टप्प्यात

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चारीच्या सोळा किलो मीटर काम अंतिम टप्प्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेली अनेक वर्षे भोजापूर चारीचा प्रश्न प्रलंबित होता.त्यामुळे भोजापूर धरणात पाणी असूनही पाण्या पासून वंचित राहाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती.विशेष म्हणजे ही गावे निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेली होती. या गावांना भोजापूर पाण्याशिवाय पर्याय नव्हता.निधी अभावी कामाची सुरूवात होत नव्हती.बहुतेक वेळा ठेकेदार बदलत गेल्याने कामातही अडथळे निर्माण होत होते.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंधारण विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या चारीच्या कामाला सुरूवात होवू शकली. आता चारीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. पावसाळ्यात या चारीतून पाण्याचे वहन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

तळेगाव भाग नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जायचा.आता निळवंडे कालव्यातून पाण्याची उपलब्धता झाल्याने वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना युती सरकारमुळे न्याय मिळाला.आता भोजापूर चारीच्या सर्वच कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकर्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा आता संपुष्टात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...