spot_img
अहमदनगरदुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे मोठी अडचण; पारनेरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी कुणाला काढला...

दुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे मोठी अडचण; पारनेरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी कुणाला काढला चिमटा?, वाचा सविस्तर

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामे आणि राजकारण यावरून आपल्या पक्षातील सहकारी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “विकासकामांचा दर्जा चांगला असला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचंय, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नये आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट हवंय, त्यांनी पुढारपण करू नये,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे अडचणी निर्माण होतात, असंही ते म्हणाले.
पवार यांनी स्पष्ट केलं की, प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे करावं. “पुढारपण आणि गुत्तेदारी एकत्र चालणार नाही,” असं ठणकावत त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर भर दिला. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि दर्जा राखला जावा, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सक्त सूचना दिल्या. या वक्तव्याने पक्षातील काही नेत्यांना चांगलाच चिमटा बसला असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे होता, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे पक्षांतर्गत शिस्त आणि कामाच्या गुणवत्तेवर नव्याने प्रकाश पडला आहे.
पारनेर येथे आयोजित महायुतीच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

पारनेर येथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर हिंद चौक, पारनेर येथे महायुतीच्या वतीनं आयोजित दसरा व रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून २०० हून अधिक तरुणांना रोजगाराची संधी मिळाली. तसेच पारनेर येथे विविध विकास कामांचे उद्घाटने ही करण्यात आले.

त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुजय विखे पाटील, नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप व पारनेर नगर मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, राष्ट्रवादी उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे नेते मधुकर उचाळे, माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, माजी जि प सदस्य वसंत चेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी, दत्ता नाना पवार, सागर मैड, इंद्रभान गाडेकर, नंदू औटी, प्रसाद कर्नावट, दत्तात्रय रोकडे, संदीप ठुबे, नगरसेवक अशोक चेडे, हसन राजे, सखाराम औटी, नगरसेवक नवनाथ सोबले, ज्येष्ठ नेते देवराम मगर, विकास रोकडे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुभाष सासवडे, युवा नेते प्रितेश पानमंद, सरपंच मनोज मुंगसे, सुभाष दुधाडे, युवा सेना तालुकाप्रमुख अजिंक्यतारा दरेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी थोरात, राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्षा सुधामती कवाद, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, सोनाबाई चौधरी, कविता औटी, बाळशीराम शिंदे, सुनील तांबोळी, गोपी घुले, राहुल घुले, सतिष गायकवाड, आदी उपस्थित होते.

अजित पवार दसरा मेळाव्यात पुढे बोलताना म्हणाले की मी राज्याचा अर्थमंत्री आहे जलसंपदा खातेही विखे पाटलांकडे आहे. पारनेरसाठी जे करता येईल ते निश्चित करणार आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. तरच शेतकरी टिकेल जो प्रस्ताव येईल त्याला मंजुरी देऊ.पारनेर तालुक्यासाठी पाणी,रस्ते कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही आसे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणाले
महायुती सरकार पाण्याच्या सिंचन प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून, दोन दिवसांत काही मंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन अतिवृष्टीसंबंधात निर्णय घेतला जाईल. ज्या जिल्ह्यात नुकसान झाले तेथील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार असून, येथील पाणीप्रश्न, तसेच शहर विकास आराखडा मंजूर करणार असल्याची ग्वाही या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

तालुक्यात कोणाची हुकूमशाही चालू देणार नाही. मतांची चोरी झाली असं विरोधक खोटं पण रेटून सांगतात. परंतु लोकसभेला आमचा पराभव झाला. आमच्या कमी जागा आल्या, तरीही आम्ही म्हटले नाही की मतांची चोरी झाली. पराभव मान्य करून पुन्हा जनतेपर्यंत गेलो. लाडक्या बहिणीसारखी योजना आणली. विधानसभेला महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.

सिस्पे घोटाळ्यातील आरोपींवर होणार कठोर कारवाई
सिस्पे सारख्या फसवणूक करणाऱ्या आर्थिक संस्था सुरू होतात; मात्र नागरिकांनी त्यात पैसे गुंतवू नयेत. जिल्हा बँकेसह इतरही अनेक चांगल्या आर्थिक संस्था अस्तित्वात आहेत तेथे गुंतवणूक करावी. या घोटाळ्यातील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

तरुणांच्या हाताला मिळणार काम
पारनेर पहरसरात सुपे औद्योगिक वसाहतीत अनेक नवीन कंपन्या येत आहेत. तिथे रोजगार आम्ही वाढवत आहोत. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्या ठिकाणी कोणाचीही दादगिरी खपवून घेतली जाणार नाही. आज रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने मुलाखती पार पडल्या. नोकऱ्याही मिळाल्या आहेत.     – अजित पवार, उपमुख्यमंत्री.

पाणी योजना मंजूर करा
20 वर्षांपूव माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या काळात मांडओहोळ काळू प्रकल्पाचे काम झाले. त्यानंतर तालुक्यातील पाणी योजना प्रलंबित आहेत. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. ती मंजूर करावी. महामार्गांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत. तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा ते चंदनापुरी घाट हा रस्ता मंजूर करण्यात यावा. त्यामुळे तालुका चार महामार्गाला जोडला जाईल.                                  – आमदार काशीनाथ दाते.

सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी
घालणाऱ्यांना जनतेसमोर आणणार
महायुतीत समन्वय साधत विकासकामांवर तालुक्यात चांगले काम सुरू आहे. तालुक्यात वाईट गोष्टी बंद झाल्या आहेत. सिस्पेच्या घोटाळ्यातील आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांना पाठीशी घालणारे कोण आहेत त्यांना आगामी निवडणुकीत जनतेसमोर आणणार आहे.
– माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील

तरुणांच्या कल्याणासाठी राजकारणात उभा
आमच्या तालुक्यातील हुकूमशाही व दंडेलशाही गाडून टाकण्यासाठी व तरुणांच्या कल्याणासाठी राजकारणात उभा राहिलो. आमच्या तालुक्यातील तरुणांचा फक्त वापर केला जातो, हे लक्षात आल्यानंतर मी एका नेत्यापासून बाजूला झालो.
– विजय औटी, माजी नगराध्यक्ष

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घार्गे साहेब; ‌‘खाकी‌’चं ‌‘खमकं पोलिसिंग‌’ कधी?

  गुन्ह्याला अटकाव करणारी मजबूत बांधबंदिस्ती कधी? गुन्ह्यातील ‌‘रिस्पॉन्स टाइम‌’ महत्त्वाचा अन्‌‍ तेच खरे पोलिसिंग! सारीपाट...

पुन्हा धो धो पाऊस; नगरसाठी ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक ३ ते ४ ऑक्टोबर...

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे व गवई गटांमध्ये खलबते; किरण काळे व सुशांत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती

अहिल्यानगर। नगर सहयाद्री महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. मागील आठवड्यात मातोश्री...

अखेर तस्करीचा पर्दाफाश; गुटख्याने भरलेली कार जप्त तर ट्रक चालकाने ५१ बॅटऱ्या केल्या लंपास, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात बंदी असलेल्या सुगंधी गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस कोतवाली...