spot_img
महाराष्ट्रराज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप? अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप? अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झालं आहे. मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचं गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलं आहे. अमोल मिटकरींनी व्यक्त केलेलं भाकित खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भुजबळांच्या नाराजीवर काय म्हणाले?
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अमोल मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांना आधी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. भुजबळांना मंत्रिपद दिलेलं नाही. त्यांची नाराजी आहे, असं म्हणत प्रश्न विचारला गेला. त्यावर अमोल मिटकरींनी, “नाराजी कसली असेल? 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादीचे. त्यापैकी 8 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असं असल्याने नाराजी होणं सहाजिक आहे. मला वाटत नाही कुठली नाराजी असेल. तुमच्याच माध्यमातून कळतंय की काही ओबीसी बांधव नाराज आहेत. तो पक्षाकडून राज्यसभेवर लवकरच जातील अशी माहिती तुमच्याकडूनच मिळाली. जर कोणाची नाराजी असेल तर पक्ष पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्याच नाही तर भाजपामध्येही असे अनेक नेते आहेत. सुधीरभाऊंसारखे आहेत. शिंदे साहेबांच्या पक्षातील केसरकरांना शपथ घेता आली नाही. त्यामुळे नाराजी असणे सहाजिक आहे,” असं उत्तर दिलं.

पुढे बोलताना मिटकरींनी, “जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जी जी काही महामंडळं आहेत त्यावर जे जे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, नाराज आहेत त्यांची त्यावर बोळवण केली जाईल, असं वाटतं. तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील पाच वर्ष टिकणारं सरकार चालवतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मला वाटतं,” असंही म्हटलं.

वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या…
यानंतर मिटकरींना, “एक मंत्रिपद खाली ठेवलं आहे. ते नेमकं कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकित केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे. “मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं. त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय घेतील. तुम्ही बघा आता. वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे,” असं उत्तर मिटकरींनी दिलं.

डिसेंबरच्या शेवटपर्यंत…
“मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच नक्की येतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. एका जागेच्या मागील तेच कारण आहे योग्य व्यक्ती, योग्य निर्णय, योग्य वेळ त्यासाठीच एक जागा खाली आहे,” असं सूचक विधान मिटकरींनी केलं आहे. खरोखरच जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर तो त्यांच्यासाठी पक्षफुटीइतकाच मोठा फटका ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे.

भुजबळ राज्यसभेवर जाणार
तर मंत्रीमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, “भुजबळ नसल्याने ओबीसी बांधव नाराज असल्याचं दिसलं. मात्र भुजबळ हे राज्यसभेवर जाणार आहेत. मुनगंटीवार, केसरकर यांना शपथ घेता आली नाही. तिन्ही पक्षातील नाराजांसोबत बोलतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झालं पाहिजे, “असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...