spot_img
अहमदनगरनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई!, दोघांना पडल्या बेड्या, मोठ्या रक्कमेसह नोटा मोजण्याचे यंत्र...

नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई!, दोघांना पडल्या बेड्या, मोठ्या रक्कमेसह नोटा मोजण्याचे यंत्र जप्त

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंजबाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली. दोघांवर धडक कारवाई करण्यात आली असून १२ लाख ३९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोहे कॉ. मलिकार्जुन बनकर यांच्या फिर्यादीवरू रोहित अशोक बोबडे (वय २९) आणि आकाश अशोक बोबडे (वय २७, दोघे रा. घाडगे वाडी, फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

१२ जून २०२५ रोजी दुपारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दोन इसम बेकायदेशीर रित्या रोख रक्कम घेऊन गंजबाजार येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली. त्यांनी पथकालासापळा रचून संशयितांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई केली. तपासादरम्यान दोघांकडून ११ लाख ७८ हजार ४०० रुपये रोख रक्कम, ४१ हजार रुपये किंमतीचे विविध मोबाईल ब्रँडचे ४ मोबाईल, १० हजार रुपये किमतीचे नोटा मोजण्याचे यंत्र असा एकूण १२ लाख ३९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार कोतवाली हद्दीत सुरु असताना स्थानिक पोलिसांना त्याची खबर नव्हती, हे विशेष लक्षवेधी आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट पुढाकार घेऊन कारवाई केल्याने ही कारस्थान उघडकीस आली आहे.या कारवाईमुळे आर्थिक गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रोख रकमेचे स्रोत, संभाव्य हवाला व्यवहार व इतर आर्थिक गैरव्यवहारांवर अधिक संशोधन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

याप्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोनि. इसामोद्दीन पठाण, सफौ. शकील शेख, पोहेकॉ. मलिकार्जुन बनकर, पोकॉ. अमोल कांबळे, अक्षय भोसले, शुभम लगड यांनी सहभाग घेतला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘आमदार जगताप यांच्या घरी संभाजी भिडे गुरुजींची भेट’; काय दिला सल्ला?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी...

भिस्तबाग परिसरातील ‘त्या’ कार्यालयाला नागरिकांनी ठोकले टाळे; कारण काय?

जुना मीटर द्या, वाढीव बिल रद्द करा; अन्यथा बिल भरणार नाही; संपत बारस्कर अहिल्यानगर |...

शिवसेनेचे विक्रम राठोड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; वाचा, प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक नेता सुभाष...

..आता तीन तेरा वाजले ना!; नगरसेवक मनपा प्रशासनाचा विरोधात आक्रमक

शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, नागरिक भयभीत अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरामध्ये एकीकडे विकासाची कामे मोठ्या प्रमाणात...