अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नेप्ती मार्केट येथे कांदा खरेदीच्या नावाखाली 26 लाख 41 हजार 379 रुपये आणि 20 पैशांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे राहूल रामदास आंधळे (वय 31, व्यापार, रा. प्लॉट नं. 5, पारीजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी महंमद नदीम (सब्जीमंडी, पिलीभित, उत्तरप्रदेश), आरीफ रजा, महमंद युनुस अँड कंपनी, महमद हसीन आणि छोटे मियाँ अँड कंपनी यांनी सामायिक हेतूने फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन करून 4 जानेवारी 2020 ते 9 मार्च 2020 या कालावधीत नेप्ती मार्केट येथे ट्रान्सपोर्टद्वारे कांदा खरेदी केला.
मात्र, त्यांनी फिर्यादीला 26 लाख 41 हजार 379 रुपये 20 पैसे देणे बाकी ठेवून फसवणूक केली. घटनेची माहिती मिळताच स. फौ. रविंद्र डावखर यांनी तपास सुरू केला. अंमलदार पोहेकॉ खराल आणि प्रभारी अधिकारी सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.