spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! शरद पवार आंदोलनात सहभागी होणार?; राज्य सरकारला दिला इशारा

मोठी बातमी! शरद पवार आंदोलनात सहभागी होणार?; राज्य सरकारला दिला इशारा

spot_img

Sharad Pawar News: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने केलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकार्यांना पवारांनी त्यांच्या मागण्यांबद्दल सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणालेत शरद पवार?
“विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत सरकारने यावर योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्यातील आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.”असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे यांची आंदोलनस्थळी भेट
काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून आज यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...