मुंबई । नगर सहयाद्री:-
खंडणी प्रकरणावरून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. ते व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याबाबत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना देखील बोलवण्यात आलं होतं. बैठकीमध्ये फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ती, सरकारची प्रतिमा मलीन होताना दिसतेय. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. त्यामुळे आता धनंजन मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांचे पीए प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधक आक्रमक
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडसह मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात करून त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला.