spot_img
अहमदनगरमोठी बातमी: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना बेड्या; कोर्टात हजर केलं जाणार..

मोठी बातमी: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना बेड्या; कोर्टात हजर केलं जाणार..

spot_img

Vasant Deshmukh: भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर वसंतराव देशमुखांचा शोध घेतला जात होता, मात्र ते फरार झाले होते, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता

अखेर त्यांना नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच पथकांने सदरची कारवाई केली आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...