spot_img
देशमोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध यात्रेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, तर ३० भाविक...

मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध यात्रेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, तर ३० भाविक जखमी

spot_img

Stampede at Goa Temple: गोव्यातील प्रसिद्ध लैराई देवीच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. शिरोडा (गावातील या धार्मिक उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरी होणारी लैराई देवी यात्रा यंदा जीवघेणी ठरली.

शनिवारी यात्रेदरम्यान मोठी गर्दी उसळली होती. प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी एका उतारावर वेगाने हालचाल करत असताना पळापळ झाली आणि गोंधळाच्या परिस्थितीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ भाविकांनी आपला जीव गमावला असून, ३० जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्यमंत्री सावंत यांनी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. तसेच सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

लैराई देवीच्या यात्रेला गोव्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) पार पडणाऱ्या या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा. ‘धोंड’ म्हणून ओळखले जाणारे भक्त उकळत्या अंगारांवर अनवाणी चालतात. श्रद्धा आणि भक्तीचे हे अत्यंत महत्वाचे प्रतीक मानले जाते. हे मंदिर दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात आहे.

या गावात मांसाहार वर्ज्य आहे, आणि कोणत्याही प्राण्याची हत्या निषिद्ध आहे. यात्रेच्या दिवशी गावात दारू व अंडीही पूर्णतः प्रतिबंधित असतात.दरम्यान, याच यात्रेत गर्दीचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात्रेदरम्यान दरवर्षी ४० ते ५० हजार भाविक येथे हजेरी लावतात, त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना आणि नियंत्रित प्रवेश आवश्यक असतानाही यंदा पुरेशा तयारीचा अभाव जाणवला असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

शिर्डी । नगर सहयाद्री:- पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान...

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पणे । नगर सहयाद्री:- कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे...

६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू; ‘असा’ करा अर्ज..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध...

पाकिस्तानला मोठा धक्का!; भारताचा महत्वपूर्ण निर्णय

India vs Pakistan: भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच...