spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा; ऑनलाइन बैठकीत महत्वपूर्ण निर्णय..

मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा; ऑनलाइन बैठकीत महत्वपूर्ण निर्णय..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेची निवडणुकीआधी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकताच शिवसेना नेत्यांची ऑनलाईन महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ही बैठक झाली. यामध्ये स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली. निवडणुसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना देण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणूकीसाठीही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व/ पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, मंत्री, आमदारांची महत्वाची बैठक नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

या बैठकित औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्येही रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत या निवडणुका लढवतील अशी आशाही धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. या सूचना करताना निवडणुका या युतीत अन्यथा स्वतंत्र लढण्यासाठी तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...