spot_img
अहमदनगरमोठी बातमी! शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार; अशी घडली घटना..

मोठी बातमी! शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार; अशी घडली घटना..

spot_img

श्रीरामपूर / नगर सह्याद्री :
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे, असे मातापुर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांच्या गाडीतील चालक चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसुन रात्री एक वाजेच्या सुमारास श्रीरामपुरकडे निघालो. गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होतो. त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आलं की, दोन मोटारसायकल आमचा पाठलाग करत आहेत. त्याबाबत मी माझ्या सोबतच्या लोकांना सांगितलं. काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य गेट आले.

संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितलं. चालकाने गाडी गेटकडे वळविली, परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची गाडी आत जावु शकली नाही, म्हणुन चालकाने गाडी उभी केली.

त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकलवरील व्यक्तींनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या केल्या. त्या तीन व्यक्ती अंदाजे 20 ते 25 वयोगटातल्या होत्या. तसेच शरीराने सडपातळ असणारे दोघे आमच्या उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या समोर चालत आले. त्यामुळे मी चालकाला आमची बोलेरो गाडी मागे घेवुन पुन्हा श्रीरामपुरच्या दिशेने घेण्यास सांगितली. चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तीने त्याच्या कमेरला लावलेला एक पिस्टल काढुन आमच्या गाडीच्या दिशेने एक गोळी फायर केली. परंतु आमची गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही गाडी वेगात चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने आलो. श्रीरामपुरमध्ये येवुन आम्ही माझे मित्र आणि सहकारी प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येवुन तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेचे जनजागृती अभियान यशस्वी; अहिल्यानगर शहराचा मतदानाचा टक्का वाढला

आदर्श मतदान केंद्राची उभारणी; मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

राज्यात 65.11 टक्के तर नगर जिल्ह्यात 71.73 टक्के मतदान

30 वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह मुंबई । नगर...

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Gautam Adani News भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतली एका कंपनीने गुंतवणुकदारांची फसवणूक...

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? कुणाला किती जागा मिळणार? पहा, एक्झिट पोल..

Exit Polls: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया...