मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कष्टानं उभे केलेले पीकं वाहून गेलंय. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. शेतकऱ्यांचे फक्त शेतीच नाही तर, घर आणि जनावरं देखील वाहून गेली आहेत.
नुकसान झाल्यानंतर सत्ताधारीसह विरोधकही नुकसानग्रस्त भागात गेले होते. खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. विरोधक आणि शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली. तसेच ओला दुष्काळ करण्याचीही मागणी.
याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी मदत जाहीर केली.
शेतकऱ्यांचं किती नुकसान?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. ग्रामिण भागातील घर, गोठे, जनावरांचे नुकसान. शेतात चिखल. जमीन खरडून गेली. रब्बीची पेरणी करायची स्थिती राहिली नाही. ६८ लाख ६९हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान. राज्यात एक कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी ६९ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले.