दिल्ली / नगर सह्याद्री : दिल्लीत आज शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मालगाडीला अपघात झाला आहे. नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना सकाळी 11.52 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधीही झाली होती दुर्घटना
मागील वर्षी 6 ऑक्टोबर 2023 रोजी देखील दिल्लीत मालगाडीला अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. यासोबतच अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. अपघाताबाबत चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. याआधी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या गाझियाबादमध्येही मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आजच्या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचे समोर आलेले नाही.