spot_img
देशमोठी बातमी ! ‘पुष्पा’ फेम अभिनेत्यास अटक, महिलेला ब्लॅकमेल करून...

मोठी बातमी ! ‘पुष्पा’ फेम अभिनेत्यास अटक, महिलेला ब्लॅकमेल करून…

spot_img

नगर सह्याद्री / हैद्राबाद : सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी आली आहे. महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ‘पुष्पा : द राईज’ फेम अभिनेत्यास अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा : द राईज’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जगदीश प्रताप बंडारी याना अटक केली आहे.

त्यांनी या सिनेमात पुष्पाचा मित्र केशवची भूमिका साकारली होती. एका ज्युनिअर आर्टिस्टसोबत 30 वर्षीय जगदीश लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. संबंधित महिलेनं 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी जगदीशवर आरोप केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आणि पुढील तपास केल्यानंतर बुधवारी पोलिसांनी अभिनेत्यावर अटकेची कारवाई केली.

काय आहे प्रकरण?
29 नोव्हेंबर रोजी सदर महिलेने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. ती महिला 27 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या व्यक्तीसोबत होती. त्याचा व्हिडीओ जगदीशने शूट केला होता आणि त्यावरून तो तिला ब्लॅकमेल करत होता, असं पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलं.

व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानंतर महिलेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यानंतर त्याला अटक केली. जगदीशने ‘सत्थी गनी रेंदु येकारलु’ या छोट्या बजेटच्या ड्रामामध्ये काही दिवसांपूर्वी काम केलं होतं. याशिवाय तो नितीन आणि श्रीलीला यांच्या ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन’ आणि ‘अंबाजीपेटा मॅरेज बँड’ या चित्रपटांमध्येही झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...