spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी : पार्थ पवारांनी घेतली मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेची भेट,...

मोठी बातमी : पार्थ पवारांनी घेतली मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेची भेट, कशासाठी? पहा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाल्यानंतर हा विषया सर्वत्र चर्चिला जात असताना आता मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे आता चर्चेत आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

गजानन मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गजा मारणे त्याची पत्नी आणि पार्थ पवार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे भेट घेतली याबाबतत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूीवर भेट घेतली असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या भेटीवेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.

गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून मारणे टोळीच गजा मारणे मुख्य म्होरक्या आहे. गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. पुण्यात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातील टोळीयुद्ध पुण्याला माहिती आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्येस गजा मारणेला अटक झाली होती. तीन वर्ष तो येरवड्यामध्ये होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा असून दोन्ही टोळ्यांचे म्होरके शरद मोहोळ आणि गजानन मारणे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढले, पुढे नको तेच घडले!, ‘यांना’ कारागृहाची हवा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल...

युपीआय सेवा डाऊन! महिन्यात दुसरी वेळ, कारण काय?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे....

स्वत:ला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर…; अमित शाह रायगडावरुन गरजले!

रायगड । नगर सहयाद्री:- शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत, असे ठाम...

चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल फेकले! नगर शहरात धक्कादायक प्रकार, कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची...