spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! काल मराठा आरक्षण मंजूर, आज थेट उच्च न्यायालयात स्थगितीसाठी...

मोठी बातमी ! काल मराठा आरक्षण मंजूर, आज थेट उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : काल झालेल्या अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळेल. परंतु आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनकडून उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शुक्रे यांच्यासह अन्य सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देत त्यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन कडून जनहित याचिका करण्यात आली आहे. नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. तसेच मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसीलाही स्थगिती देण्याची मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी पार पडेल. मात्र यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही तसाच प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...