spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी...

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आले आहेत. प्रसंगी त्यांनी आक्रमक भूमिका देखील घेतल्या आहेत. परंतु त्यांनी आज मोठी घोषणा केली असून मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे असे म्हटले आहे.

परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची महित्यी जरांगे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पार्थ पवारांचा जमीन घोटाळा; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; सखोल चौकशीचे आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले...

महापालिका निवडणूक; मनसेचा मोठा निर्णय, काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर महानगरपालिका...

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...