spot_img
अहमदनगरमोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचं समजतंय. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असंही सांगण्यात आलंय.

महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. आता त्यांची महाराष्ट्राच्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये राज्यपाल पदाचा पदभार संतोषकुमार गंगवार सांभाळणार आहेत.

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
६७ वर्षीय सी.पी राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन हे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...